
वाळूज महानगर, (ता.26) – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी काॅलनी, गारखेडा परीसर संभाजीनगर येथे पेवर ब्लॉक व वृक्षारोपण या कार्यक्रमाच्या शुभारंभ बुधवारी (ता.26) रोजी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक चक्रनारायण, माजी नगरसेवक विनोद सोनवणे, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे पाटील, विभाग प्रमुख मोहन मामा म्हस्के, शाखा प्रमुख वाघमारे गुरूजी, शाखा प्रमुख कल्याण चक्रनारायण, संजय पैठणकर, संभाजी वाघ, बाबासाहेब बगडे, सुभाष आडे, मनोज चव्हाण, सुकलाल हिवराळे, देशपांडे काका, आतळेकर काका, विष्णू कापसे, मगरकर काका व इतर मान्यवर उपस्थित होते.
