March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.25) – राष्ट्राच्या उन्नतीसाठी उद्योगांचे गुणवत्ता धोरण महत्त्वाचे असून उद्योग समूहांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच उत्पादन, सेवांचा दर्जा जागतिक पातळीवर राखला पाहिजे. असे प्रतिपादन मेटा फोर्ज इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ मेहता यांनी केले.

कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या विभागीय संमेलनात ते बोलत होते. गुणवत्ता संकल्पनेतून सांस्कृतिक बदल या संकल्पनेवर आधारित हे संमेलन देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ.उल्हास शिवूरकर उपस्थित होते.

याप्रसंगी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष नितीन किनगावकर यांनी क्यू सी एफ आय ने हाती घेतलेल्या विविध उपक्रम जसे होम फाईव्ह एस, उद्योगांना गुणवत्ता धोरणांची ट्रेनिंग, फाईव्ह एस सर्टिफिकेशन आदी उपक्रमा संदर्भात विस्तृत माहिती दिली. आपल्या संबोधनात मेटा फोर्ज इंडस्ट्रीजचे कौस्तुभ मेहता यांनी उद्योगात बदल करण्याची आवश्यकता असून गुणवत्तेची कास धरल्याशिवाय हे शक्य होणार नाही, तसेच गुणवत्ता आणि उद्योगाच्या विकासासाठी कर्मचारी, कामगार, उद्योजक या सर्वांमध्ये सकारात्मक वैचारिक बदल घडवणे आवश्यक आहे. प्रशिक्षण, कार्यशाळा तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून हा वैचारिक बदल आपल्याला घडवता येईल. असे ते म्हणाले. यासंदर्भात जपान या राष्ट्रांमध्ये कशाप्रकारे प्रयत्न केले जातात, याची माहिती त्यांनी विविध उदाहरणाद्वारे दिली. डॉ. उल्हास शिवूरकर यांनी क्यू सी एफ आय छत्रपती संभाजीनगर विभागाचे अभिनंदन करत शाळा महाविद्यालयापासूनच गुणवत्तेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले पाहिजे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी क्यू सी एफ आय चे उपाध्यक्ष संदीप गरुड, समन्वयक सुधीर पाटील, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तृप्ती महाजन तसेच अंकिता तारो यांनी तर आभार सुधीर पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जोशी, अमोल गिरमे, महेंद्र वानखेडे, विजय आडलक, संजय वैद्य, डॉ.अस्मिता जोशी, संदीप गरुड, सुधीर पाटील, राजेंद्र पवार, अंकिता डॉ. बापूराव मारलापल्ले, प्रा. तेजस सुदर्शन धारूरकर आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *