
वाळूजमहानगर, (ता 22) – ज्या मेंढ्यांच्या पायस्पर्शाने शेतीतील उत्पन्न वाढते, श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात. अशा बाळूमामाच्या मेंढ्यांचे वाळूज नगरीत शनिवारी (ता.22) रोजी सायंकाळी वाळुजनगरीत आगमन झाले. या मेंढ्या पाहण्यासाठी व बाळूमामाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
महाराष्ट्रभर नावाजलेल्या बाळूमामाच्या मेंढ्या अकराशे वरून आज पस्तीस हजार झाल्या आहेत. या मेंढ्यांचे वेगवेगळे अठरा कळप आहेत. कोणीही मालक नसलेल्या या मेंढ्यांचे फक्त चालक म्हणजेच कारभारी हे सेवेकरी आहे. या मेंढ्यांचे कळप महाराष्ट्रभर फिरत असते, ते शनिवारी (ता.22) रोजी सायंकाळी पैठण मार्गे वाळूजनगरीत दाखल झाले. बाळूमामा यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला. त्यांची समाधी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आहे. बाळू मामाची कीर्ती कर्नाटक व महाराष्ट्रभर पसरली आहे. दीन, दुःखी अशा अनेकांना बाळू मामाने बरे केले, अनेकांच्या व्याधी नाहीशा झाल्या. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या मेंढ्यांच्या रूपात ते आजही श्रद्धाळूच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रभर या मेंढ्यांची आवभगत केली जाते. अनेक जण या मेंढ्यांची भक्ती भावाने पूजा करून दर्शन घेतात. सायंकाळी प्रवचन होऊन बाळू मामांची आरती केल्या जाते.
या कार्यक्रमास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. असाच कार्यक्रम वाळूज येथे होत आहे. आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन युवासेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. दोन दिवस मुक्कामानंतर या बाळू मामांच्या मेंढ्यांचा कळप पुढे मार्गस्थ होणार असल्याचे या मेंढ्याचे कारभारी यांनी सांगितले.
