March 24, 2026


वाळूजमहानगर,(ता.22) – वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथील गट नंबर 59 मध्ये शेतीच्या वादातून लाठ्याकाठ्या, चाकू, तलवार तसेच कमरेच्या बेल्टने झालेल्या हाणामारी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.20) रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास झालेल्या या हाणामारीत दोन्ही गटातील सहा जण जखमी आहेत.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुकेश उर्फ बबलू त्रिंबक साळे वय 24 वर्षे, रा. वडगाव (को.) ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, गट नं 59 मध्ये एकनाथ तुकाराम साळे यांच्या कुटुंबाची सात एकर जमिन होती. त्यातील पाच एकर मुस्लीम व्यक्तीला विकली. दोन एकर सलामपुरे यांना नोटरीवर विक्री केली. परंतु 7/12 वर जमिन कमी झाली नाही. त्यांची जमिन शिल्लक नसताना ते आमच्या जमिनीवर ताबा सांगत आहेत. गुरुवारी (ता.20) रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास
मुकेश साळे, पत्नी वैष्णवी मुकेश साळे शेतात खुरपणी करत असताना राजेश साळे, एकनाथ साळे, उद्धव साळे, मयुर साळे असे तिथे आले व म्हणाले की, तुम्ही आमच्या शेतात काय करता असे म्हणुन शिवीगाळ करत दोघांनाही मारहाण केली. त्यामुळे फोन करुन सांगितल्याने भाऊ ऋषिकेश व अभिषेक तेथे आले. आणि मध्यस्थी करुन भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी चाकु, कंबरेचा बेल्ट, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी मुकेश त्रिंबक साळे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी राजेश साळे, एकनाथ साळे, मयूर साळे, उद्धव साळे यांच्याविरुद्ध कलम 326, 324, 504, 34 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *