
वाळूजमहानगर, (ता.15) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये यलो डे शुक्रवारी (ता.14) रोजी मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका निर्मला म्हस्के, तर प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती. 
यावेळी सर्व विद्यार्थी पिवळ्या रंगाचे सुंदर ड्रेस घालून आले होते. तसेच पिवळ्या कलरचे फुगे, लहान लहान खेळणे घेऊन आले होते, छान सजावट करून कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थांनी जेवणाच्या डब्यामध्येही पिवळ्या रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणले होते. यावेळी सोनाली कुलकर्णी, रुपाली उपळकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, सुवर्णा जोशी, शीतल चौधरी, वीणा कन्नवार, मोनिका चतुर्भुज, भाग्यश्री मुळे, मयुरी पवार, सरिता डावखर, सुवर्णा कदम, सरला रोडगे, राणी कांबळे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.
