
वाळूजमहानगर, (ता.14) – अंबेलोहोळ येथे पती-पत्नीत झालेल्या भांडणाची माहिती माहेरी सांगितल्याने जावयाच्या सासरकडील मंडळींनी 31 वर्षीय जावयास रविवारी (ता.9) रोजी जिवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता.13) रोजी मृत्यू झाला. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, वाळूज परिसरातील आंबेलोहोळ येथे रविवारी (ता.9) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गिता अनिल पिंपळे व अनिल शालिन पिंपळे या पतीपत्नीत घरगुती वाद झाला होता. या वादाची माहिती गिताने तिच्या आई वडीलांना सांगितले. त्यामुळे अनिलचे सासरे संजय लक्ष्मण चव्हाण, सासु पारुबाई संजय चव्हाण, मेव्हणा कृष्णा संजय चव्हाण व साडु करण भिमा पवार यांनी अंबेलोहळ येथे येऊन आमच्या मुलीला त्रास का देतो. असे म्हणुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. या मारहाणीत लाकडी दांडा, चाकूचा वापर झाल्याने अनिल गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याने जोरजोरात आरडाओरड केल्याने गावातील अफसर अकबर पटेल, सारंग काळे व अशोक उगले यांनी अनिलला त्यांचे पासुन सोडवुन उपचारासाठी घाटी दवाखाना येथे दाखल केले. उपचार सुरू असतांना गुरुवारी (ता.13) जुलै रोजी अनिल पिंपळेचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी सासरे संजय चव्हाण, सासु पारुबाई चव्हाण, मेव्हणा कृष्णा चव्हाण तसेच साडू करण पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एस डी आधाने करत आहे.

कृष्णा पवार यांनीही दिली तक्रार –
दरम्यान कृष्णा संजय पवार यांनीही वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, बहीण गिता अनिल पिंपळे हिने तिचा पती अनिल पिंपळे हे तिला वारंवार त्रास देत आहे. असे कळविल्याने मी व माझे आई वडील असे आम्ही गिता हिचे घरी आंबेलोहळ येथे संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास बहिणेचे पती अनिल यांना समजावण्यास त्यांचे घरी गेलो असता तेथे आमच्या मध्ये बाचाबाची होवुन वाद झाला, तेव्हा मी व माझे आईवडील आम्ही आमचे घरी एकलेहरा येथे परत आलो. त्यानंतर रात्री 9 वाजेच्या सुमारास सुनिल शालीन पिंपळे, गणेश शालिन पिंपळे, पप्पु पुनमचंद काळे व निकीता गणेश पिंपळे असे आमच्या घरी आले व आम्हाला सुनिल शालिन पिंपळे याने माझे भावासोबत वाद का केला असे म्हणुन लाकडी दांड्याने मारुन जखमी केले.
