March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – भरधाव येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जखमी झाला. त्यास श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या विनामूल्य ॲम्बुलन्सने उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी (ता.12) रोजी रात्री झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील ईसारवाडी फाट्यावर अपघात झाल्याची माहिती वाळूज पोलीस ठाण्यामधून रात्री दोन वाजता मिळाली असता श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या विनामूल्य ॲम्बुलन्सने पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमी श्रीकांत प्रकाश कुलकर्णी वय 22 वर्ष रा.एन -7 सिडको छत्रपती संभाजीनगर यास संभाजीनगर येथील ओरियन सिटी केअर हॉस्पिटल येथे दाखल केले. श्रीकांत कुलकर्णी हे बुधवारी (ता.12) रोजी रात्री पुण्यावरून संभाजीनगरला येत असताना ईसारवाडी फाट्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी (एम एच 20, एफ सी -8548) ला जोराची धडक देऊन निघून गेला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *