
वाळूजमहानगर, (ता.5) – धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात ’गुरूपौर्णिमा कार्यक्रम’ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख वक्त्या श्रीमती साबळे यांनी एकलव्य व अरुण ’गुरू-शिष्यांची’ कथा सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता खोतकर यांनी ऐतिहासिक गुरु शिष्यांची माहिती देऊन त्यांच्यातील वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना सांगितले. त्या गुणांना आपणही अंगीकरावे अशी प्रेरणा दिली. यानिमित्ताने प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना आईवडील, आजीआजोबा, काकाकाकू, मामामामी, मोठा भाऊ, मोठे बहिण या विषयांवर एक मिनिट उत्स्फूर्त बोलणे अशी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उत्तम वक्तृत्व करणाऱ्यांचे तीन क्रमांक काढण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती लहाने यांनी केले तर आभार श्रीमती देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका स्मिता खोतकर तसेच शाळेचे सर्व शिक्षकावृंद यांनी सहकार्य केले.
