
वाळूजमहानगर, ता.1 (बातमीदार) – मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूरात विठोबाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचा जनसागर उसळला होता. या भाविकांच्या सेवेत कुठेही कमी राहू नये या उद्देशाने नेहमीच 80 टक्के समाजकारण करणारे हजारो शिवसैनिक भाविकांच्या सेवेत स्वत:ला वाहुन घेत असतात. सेवेची ही परंपरा अखंड सुरू ठेवण्यासाठी शिवसेनेचे निष्ठावंत तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड दरवर्षी फराळ, फळे, चहा व पाणी वाटप करत असतात. ही परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी हे फराळ वारकरी व भाविक भक्त निष्ठावंतांचे फराळ म्हणून मोठ्या आदराने स्वीकारत होते. यावेळी भाविकांचे निष्ठेला मिळणारे प्रेम निष्ठावंत शिवसेनेचे सर्व नेते व शिवसैनिकांनी याची देही याची डोळा अनुभवले.
हे प्रेम पाहून तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी ही अखंड सेवा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याचा निश्चय व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते व जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख सागर शिंदे, उपतालुका प्रमुख कैलास भोकरे, विष्णु जाधव, सचिन गरड, तालुका संघटक मनोज गायके, उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे, किशोर खांडरे, नामदेव सागडे, विभाग प्रमुख गणेश सुर्यवंशी, संतोष जाटवे, विनोद दाभाडे, त्रिंबक जगताप, अण्णा कांडेकर, नितीन पवार, महेश घोडके, अमोल वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
