March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.28) – शहीद भगतसिंह हायस्कूल बजाजनगर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करत शालेय परिसर ते बजाजनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी व विठ्ठल रुक्माईचा वेशभूषा करून हातात टाळ, डोक्यावर टोपी,टिळा लावून वाजत गाजत पांडुरंगाची पालखी मिरवणूक काढली.

यात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल नावाचा जयघोष केला. याप्रसंगी मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा सण असून सर्व वारकरी या दिवशी विठ्ठलमय होतात. तसेच या दिंडीतून सर्वधर्म समभाव व माणुसकीचे दर्शन घडते. या दिंडीचे आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *