March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.23) – जागतिक योग दिनानिमित्त बजाजनगर मध्ये योग उत्साहात साजरा करण्यात आला. शिबिरामध्ये पतंजली योग परिवार आणि बेचाळीस सक्रिय योगशिक्षक. 345 योगप्रेमी साधक, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, श्रीराम मंदिर, विघ्नहर्ता गणेश मंदिर. या स्थायी वर्गातील साधकांनी उपस्थिती दाखवली.

सर्वांच्या संयुक्त विद्यमान संपन्न झालेल्या या जागतिक योग शिबिराला विशेष रूपान उद्योजक हनुमान भोंडवे, अनिल भैय्या चोरडिया, जिल्हा परिषद सदस्य ज्योती चोरडिया, रेखा नांदुरकर, उद्योजक अर्जुन आदमाने यांची उपस्थिती होती. तसेच योग दिनाच्या पूर्वसंध्येला बजाजनगर मध्ये मोठी योग दिंडी काढण्यात आली. योग दिंडीसाठी हिरवा झेंडा दाखवणाऱ्या ग्रामपंचायत उपसरपंच ज्योती साळे,संध्या गवळी यांची उपस्थिती होती.

पतंजली योग समिती भारत स्वाभिमान ट्रस्ट वाळूज महानगरचे मुख्य प्रभारी अंकुश भानुसे आणि मार्गदर्शक जनार्धन नवसरे, प्रकाश कदम, राजू नवले, देवीदास जाधव, दिलीप दबडे, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब तोडमल, कल्याण तवले, सूर्यकांत सणस, भगवान ससे, पद्माकर मोरे, नवले पेंटर, संजय फलटणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *