March 26, 2026


वाळूज महानगर, (ता.23) – बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेत 21 जून रोजी ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून योगगुरु प्रकाश कदम व योगगुरु लक्ष्मण शिंदे (पतंजली योगपीठ, हरिद्वार (उत्तराखंड) यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी संगीतातील विविध धून वाजवून सुमधुर आवाजात भावमय संगीताचे सादरीकरण करत वातावरण प्रफुल्लित केले. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी विविध आसनांची चित्तथरारक प्रात्यक्षिके करत सर्वांना उत्साहित केले. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक योगगुरु प्रकाश कदम व लक्ष्मण शिंदे यांनी योग दिनाचे व योगासनाचे महत्त्व विशद करून योगासनातील आसनांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून विविध आसने व प्राणायाम करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका शिंदे व तेजस्विनी फटांगरे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, समन्वयक राणी सावंत, समन्वयक गहेना शादीजा यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *