March 26, 2026

वाळूज महानगर, (ता.22) – आयसीम इंजीनियरिंग कॉलेज व तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील विद्यार्थी व पालकांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शनाचा लाभ पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन आयसीम कॉलेजचे अध्यक्ष डॉ. सुभाष झंवर यांनी कॉलेजमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुरुवारी (ता.22) रोजी केले.


या मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी गुणवंत विद्यार्थ्यासह सहभागी व्हावे. असेही आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, सर्वत्र प्रवेश घेण्यासंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. अशा काळात विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. याचे महत्त्व लक्षात घेऊन सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्याची जबाबदारी आयसीम इंजिनिअरिंग कॉलेजवर सोपविली आहे. आयसीम इंजिनिअरिंग कॉलेजने मराठवाड्यातील अनेक शहरांमधून अशा शिबिरांचे नियोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी स्वतंत्र शिबिर तर बजाजनगर या औद्योगिक वसाहतीतील विद्यार्थ्यांसाठी एक वेगळे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ.यु.टी. नागदिवे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी एम के देशमुख, डॉ. शिराळकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी तसेच सेलू, कन्नड, बजाजनगर, सिल्लोड, गंगापूर या ठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला कॉलेजचे सचिव दिलीप सारडा, विश्वस्त डॉ. कल्पना झंवर, उपाध्यक्ष रमाकांत पुलकुंडवार, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सी. एस. पद्मावत, डायरेक्टर डॉ. आर एस जहागीरदार, उपप्राचार्य हेमंत जाधव, अच्युत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *