March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.21) – आषाढी एकादशी निमित्त दर वर्षाप्रमाणे भरणाऱ्या आषाढी वारी 2023 ची पुर्वतयारी आढावा बैठकीचे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन बुधवारी (ता.21) रोजी सकाळी 10.45 वाजता किर्तन मंडप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान, पंढरपूर (वाळूज) येथे करण्यात आले आहे.

मराठवाड्यात ख्याती असलेल्या वाळूज परिसरातील छोटे पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरते. याच अनुषंगाने गुरुवारी (ता.29) रोजी आषाढी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरणार आहे. या यात्रेच्या पूर्व तयारीसाठी पंढरपूर येथे बुधवारी (ता.21) रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या अध्यक्षतेखाली व छत्रपती संभाजीनगर परिसरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या आढावा बैठकीला सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक, भक्तगण, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी पदाधिकारी, संस्थानचे विश्वस्त पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
————————–

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *