
वाळूजमहानगर, (ता.18) – शिवसेना शाखा जोगेश्वरी व ॐ साई प्रतिष्ठानच्या वतीने 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जोगेश्वरी येथे शनिवारी (ता.17) रोजी सत्कार करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने
आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात करन राजेंद्र हिवराळे-91%, संजीवनी राजेंद्र गायकवाड 90%, अनुजा संदीप अभंग 89%, आदित्य सुनील निकम 80%, कल्याणी विष्णू वैद्य 74% यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. 
यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, जोगेश्वरी ग्रामपंचायतचे तथा युवा सेना उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, माजी उपसरपंच प्रविण दुबिले, गजानन बोंबले, डॉ. दिनेश पाटील, प्रा.गोविंद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गणेश साबळे, कृष्णा काजळे, सूर्यभान काजळे, पंडित पनाड, काकासाहेब दुबिले, मुख्याध्यापक- शिरगुळे, मोरे, अवारे, कांबळे, सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ दुबिले, लक्ष्मण दुबिले, बबन भाग्यवंत, बाबासाहेब दुबिले, प्रविण काजळे, राजु काजळे यांनी परिश्रम घेतले.
