March 26, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी पर्यावरण दिवस मानला जातो. त्याचेच औचित्य साधून
सोमवारी रोजी इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे, विविध प्रजातीच्या 200 वृक्षाची लागवड करण्यात येऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.

 

पर्यावरणाचा प्रचार प्रसार व्हावा तसेच लावलेल्या वृक्षांची योग्य ती देखभाल घेत यावर्षी पर्यावरणाचे रक्षण करण्याची नवीन संकल्पना राबवण्यात आली. या नवीन संकल्पनेनुसार मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचे मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरे करण्यात आले व वृक्षाचे औक्षण करून वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगण्यात आले.
वृक्ष हे पान, फुल, फळ आणि ऑक्सिजन देतात, ऑक्सिजनचे काय महत्व आहे हे करोनाने आपणाला चांगलेच दाखवून दिलेले आहे, त्यामुळे मानवाप्रमाणे पर्यावरणावर, वृक्षावर मुलासारखे प्रेम करण्याचे व पर्यावरणासंबंधी कटिबद्ध राहण्याचे डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी उपस्थित कामगार व कर्मचाऱ्यांना आव्हान केले. यावेळी कंपनीचे युनिट हेड संजय चौबे, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, नानासाहेब गायकवाड, कमलेश जैन, देवदत्त कुलकर्णी, करिष्मा मारवाडी, संतोष कोटकर, अजिनाथ सुरवसे व कामगार कर्मचारी उपस्तिथ होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *