March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत बजाजनगर येथील सरस्वती एज्युकेशनल अकॅडमीतील स्वजित हुलमुख या विद्यार्थ्याने 720 पैकी 690 (रैंक 865) मार्क मिळवून जिल्ह्यातून अव्वल क्रमांकाने पास झाला. तसेच क्लासेसच्या सतरा विद्यार्थ्यांनी पाचशेपेक्षा अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थी व क्लासेसच्या शिक्षकांच्या परिश्रमामुळे या नेत्रदीपक यशामुळे अकॅडमीच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे.

बजाजनगर या कामगार वसाहतीत अनेक शैक्षणिक संस्था असून येथे दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने येथे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. परिणामी पुण्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरचे बजाजनगर हे शैक्षणिक हब बनत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह देशपातळीवर झळकवण्याचा मानस असलेल्या सरस्वती एज्युकेशनल अकॅडमीच्या स्वजित हुलमुखने यशाचे शिखर गाठत अकॅडमीची गुणवत्ता सिध्द केली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या सरस्वती एज्युकेशन अकॅडमीच्या उत्कर्ष पतंगे 638 गुण व पूनम घाटगे 616 गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकालात अकॅडमीमधील 17 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण प्राप्त करत नीट परीक्षा 2023 मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अकॅडमीच्या वतीने प्रा. सुनिल मोहनअप्पा पाडळकर यांनी कौतुक करून विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *