March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.16) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्या मंदिर आणि बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे 12 जून 2023 रोजी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येऊन शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

नवीन शिशू वर्ग ते 12 वी पर्यन्त प्रवेशीत झालेल्या मुलांना नवीन शाळा, कॉलेज याविषयी उत्सुकता निर्माण झालेली असते. तसेच मुलांना पहिल्या दिवशी मनात खूप भीती असते. ही भीती दूर व्हावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मुलांना शाळेत घरासारखेच प्रेम मिळावे, हसत खेळत शिक्षण मिळावे, त्यांना शिस्त लागावी. यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम विद्येची आराध्य दैवत सरस्वती मातेचे पूजन करून आणि विध्यार्थी ओळख करून त्यांना पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक एम व्हि शिनगारे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक शिरसाट बी व्ही, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा बिदरकर, हनुमान जाधव, प्रा संजय तुपे, जब्बार पठाण आदी शिक्षक उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *