
वाळूजमहानगर, (ता.27) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी परिश्रम घेणारे श्री गजानन ज्युनिअर कॉलेज, रांजणगाव (शे. पू.) च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले असून दरवर्षीप्रमाणे विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
या निकालात प्रमुखता विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक कु. पूर्वा देशमुख 77.17 टक्के, द्वितीय क्रमांक नरेंद्र कदम 72.83 टक्के व तृतीय क्रमांक कु. प्रतीक्षा चोले 68.50 टक्के मिळवून यश संपादन केले. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक कु. रोशनी काकडे 71.17 टक्के, तर द्वितीय क्रमांक कु. पूजा माळवतकर 66.17 टक्के व तृतीय क्रमांक ऐश्वर्या भालेराव 62.50 टक्के मिळवले. या यशाबद्दल विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखेतील विध्यार्थी व त्यांच्या पालकांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक् आय. जी. जाधव, सचिव हरीश जाधव, प्राचार्य महेश शिनगारे, बी. व्ही. सिरसाठ, एच. बी. जाधव, एस. यु. जाधव, व आर. के. रोकडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
