March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.25) – होम लोन मंजुरीसाठी दिलेली फाईल मंजूर असताना सुद्धा ती मंजूर करण्यासाठी 70 हजार रुपये उकळले. शिवाय मंजुर झालेले लोन वेळेत न देता व लोन मंजुर करण्यासाठी घेतलेले पैसे परत न देता मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळुन 39 वर्षीय कृष्णा माने यांनी वाळूज येथे राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. दोन महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी फायनान्स कंपनीच्या चार जणांविरुद्ध मंगळवारी (ता.24) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी जिवन डोंगरे, मनिषा गवळी, विशाल मोरे, विशाल जाधव हे सर्व निवारा हौसींग फायनान्स कंपनीत काम करत असून कृष्णा बाबुराव माने वय-39 रा. श्रद्धा कॉलनी, शिवाजीनगर वाळुज यांनी त्यांचे कंपनीमध्ये होम लोनसाठी फाईल टाकली होती. ती फाईल मंजुर असुन सुध्दा आरोपी जिवन डोंगरे, मनिषा गवळी, विशाल मोरे, विशाल जाधव यांनी संगनमत करुन माने यांच्याकडुन वेळोवेळी पैशाची मागणी करुन लोन मंजुर करण्यासाठी 70 हजार घेतले. शिवाय मंजुर झालेले लोन वेळेत न देता व लोन मंजुर करण्यासाठी घेतलेले पैसे परत न देता मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळुन कृष्णा माने याने गळफास घेवुन 26 मार्च 2023 रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी कृष्णा माने यांच्या पत्नी अनुराधा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात कलम 306, 34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजगुले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *