
वाळूजमहानगर, (ता.15) – स्वराज्याचे दुसरे छत्रपती, बुद्धिमान, संस्कृत पंडीत, पराक्रमी, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने रविवारी (ता.14) रोजी अभिवादन करण्यात आले. 
बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष मनोहर सनेर पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील, आ. भा. छावाचे युवा नेतृत्व रविंद्र मार्कंडेय पाटील, कैलास पाटील, योगेश सोनवणे, संतोष मार्कण्डेय, किशोर पाटील, गिरिधर चव्हाण, संजय सोनवणे, दादा सोनवणे, उत्तम झळके, नवनाथ काळे, गोरख वाघ, सुनील चौधरी, राम दीवटे, श्रीधर सातपुते, सुनील पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
