
वाळूजमहानगर, (ता.13) – रांजणगाव (शेणपुंजी) येथे घरी असलेली 28 वर्षीय सून घरात कोणास काही एक न सांगता अचानक बेपत्ता झाली. बुधवारी (ता.3) रोजी घडलेल्या या घटनेनंतर सासूने पोलिसात धाव घेत तिचा शोध घ्यावा अशी विनंती केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील पवननगर येथे राहणारी
श्रध्दा युवराज बिलवाळ (वय 28) ही बुधवारी (ता.3) रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास घरी असतांना ती घरातील कोणाला काही एक न सांगता घरातून निघुन गेली. तीचा आज पावेतो शोध घेतला. परंतु तिचा शोध लागला नाही. या प्रकरणी सासू पुनाबाई सुदाम बिलवाळ (वय 70 वर्ष) यांनी दिलेल्या खबरीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र बिघोत करीत आहे.
