
वाळूजमहानगर, ता.13 (बातमीदार) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल कायम ठेवत शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ मध्ये झालेल्या सी.बी.एस.ई. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे यात १० विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केले आहे.
अवजारे समीक्षा रवींद्र हिने ९६% संस्कृत विषयात १०० गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला. अथर्व विजय दहिफळे ९५% – गणित 98, गुंजाळ जयदीप गणेश ९३.८०%- हिंदी 97, पांडेय मेहेक म्रीतुन्जय ९३.६०% – एस.एस.टी 100, ताठे शुभम दादासाहेब ९३% देशपांडे देवयानी योगेश ९३%- संस्कृत 98, गायकवाड दिशा संतोष ९०.८०% पिनप्रतीवार वैष्णवी कल्याण ९०.६०%, राऊत निर्मोह राजेंद्र ९०.२०% आणि धुमाळ वेदांत रंजित ८९.६०% – एस.एस.टी 100 गुण मिळवले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.
