
वाळूज महानगर, (ता.13) – विविध सामाजिक कार्यामध्ये धडाडीने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच मूर्तिकार चरण खराडे त्यांची कन्या कु. साक्षी हीचा विवाह चि. रवींद्र फकीरचंद तुपे यांच्याशी बजाजनगर येथील गणपती मंदिरात शुक्रवारी (ता.12) रोजी उत्साहात झाला.

साक्षी व रवींद्र हे दोघेही उच्चशिक्षित असून त्यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून उच्च शिक्षण घेतले असून रवींद्र हा मुंबईत उच्च पगारावर नोकरीला आहे. त्यांना घडवण्यात त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. आज त्यांच्या विवाहासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नंदीग्राम मित्र मंडळ, विश्वकर्मा वंशिय समाज संघटना, मुकबधीर मित्र परिवार, श्रूती धवलपुरे, रुषिकेश’बागुले, शुभम संतरे, सुमीत रेवतीखेमकर, पवन धवलनपुरे, विशाल धवलनपुरे, सौरभ खेमनकर, रूषीकेश चव्हाण, हरीबाबू, विचार मंचे कार्यकर्ते तसेच प्रहार अपंग संघटनेचे पारसचंद साकला, जोतिराम जाधव त्याचबरोबर बद्रीनाथ लघाने, किशोर फेगडे, सुभाष पाईकराव, अशोक गाढे, सामाजिक कार्यकर्ते मुटकुरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या दिव्यांग वधू-वरास शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यासाठी बालाजी पांचाळ व चरण खराडे यांच्या मित्र मंडळींनी खूप परिश्रम घेतले.
