August 9, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – छत्रपती संभाजीनगर, वाळूज येथील बाफना मोटर्स इंडिया प्रा.लि. कंपनीच्या बंद असलेल्या शोरूमच्या काचा, खिडक्यांच्या काचा फोडून आणि ईलेक्ट्रिक केबल, पनल गिझर, बाथरूमचे बेसिन, नळ तोंडुन नुकसान जवळजवळ अंदाजे 7 लाख रुपयाचे नुकसान केले. हा कुरापती प्रकार शुक्रवारी (ता.12) रोजी दुपारी उघडकीस आला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, टाटा मोटर्स वाहनांचे अधिकृत विक्रीचे बजाज आँटो मटेरियल गेटच्या समोर वाळूज येथे कंपनीचे बाफना मोटर्स चे शोरूम होते. ते शोरुम हे 1 फेब्रुवारी 2022 पासून कंपनीने बंद केलेले आहे. शोरूमचा देखभालीचा चार्ज जनरल मॅनेजर सुहास महाजन यांच्याकडे आहे. ते शोरुमची पाहणी करण्यासाठी रत्नागिरी येथुन वाळूज छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी (ता.11) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आले होते. पाहणी करत असताना बाफना मोटर्स शोरुमचे मेन शटर्स चे कुलूप तुटलेले, शोरुमची समोरील फिक्स केलेली काच तुटलेली, व शोरुम मधील खिडक्याचे काचा फोडलेल्या दिसल्या. तसेच ईलेक्ट्रिक केबल, पनल गिझर, बाथरूमचे बेसिन, नळ तोंडुन कंपनीचे अंदाजे सहा ते सात लाख रूपयाचे नुकसान केल्याचे दिसून आले. याप्रकरणी कंपनीचे जनरल मॅनेजर सुहास महाजन यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

1 thought on “बाफना शोरूमचे लाखोचे नुकसान, अज्ञाता विरुद्ध गुन्हा

  1. अभिनंदन सर,
    सर आज माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या त्याचे कारण असे की मी 2005 सालि तुम्हाला मि तनवानी शाळेच्या पालक मेळाव्यामध्ये बोललो होतो की शाळेचा निकाल 90% नाही 100% लागला पाहिजे आणि ते आज तुम्ही पूर्ण केले. सर तुमचे खूप खूप अभिनंदन असेच निकाल येत राहिले तर bhondve patil public school महाराष्ट्ररामध्ये no 1 वर असेल आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान असेल पुन्हा एकदा खुप अभिंदन सर 100% निकाल लागला 🙏💐💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *