March 26, 2026

वाळूजमहानगर, (ता.13) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई बोर्ड) तर्फे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेच्या पहिल्याच बॅचचे सर्व विद्यार्थी 100 टक्के उत्तीर्ण झाले. यातील विशेष उल्लेखनीय म्हणजे कु. आसावरी कुलकर्णी ही विद्यार्थीनी या परीक्षेत 97.20 टक्के गुण घेऊन वाळूज महानगर परिसरातून सर्वप्रथम आली. त्याचबरोबर इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांमध्ये आसावरी योगेश कुलकर्णी 97.20, सोफिया जावेद 93.80, समर्थ कान्हेगावकर 93.40, हर्षिल राजप्रताप सिंग 88.40, ऋषिकेश चंद्रहार बर्डे 84.40, विजय नारायण देशमुख 86.60, प्रणव महादेव मोगल 83.80, स्नेहा गुलाब आंब्रे 84.00, ऋषिकेश अनिल पुंड 82.80, प्रियंका पवन पटेल 83.40, चेतना राजेंद्र वडगावकर 84.20 आदित्य बापूसाहेब मिठ्ठे 82.40, रेवाराम दयालाल बर्थरे 81.40, आर्यन प्रमोद देशमुख 80.60 तुमचा समावेश आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव मीनाक्षीताई भोंडवे, शाळेचे मुख्याध्यापक रवी दाभाडे, समन्वय राणी सावंत, समन्वयक गहेना शादिजा मॅडम यांनी कौतुक करत दरवर्षी यशाची अशीच उत्तुंग परंपरा राखण्याचे आवाहन केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *