March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.10) – बजाजनगर मधील महाराणा प्रताप चौक येथे हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या 483 व्या जयंतीनिमित्त पुतळ्यास दुग्धाभिषेक, पुष्पहार अर्पण, पूजन, अभिवादन दुचाकी रॅली आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी सकल राजपूत समाजाचे प्रतिनिधी व राजपूत उद्योग ग्रुपचे सतीशसिंह राजपूत, मंगल प्रिंटर्स चे मंगलसिंह पाटील, अशोक बैनाडे, नंदाताई राजपूत, गोकुळसिंग घुणावत, गणेशसिंग चौहान, विक्रम पवार, कुणाल ठाकूर, विनोद मेहेर, चंदन मेहेर, बापुसिंग पाटील, चरण सिंग यासह असंख्य राजपूत समाज बांधव उपस्थित होते. त्यानंतर महाराणा प्रताप चौकातून मोटरसायकल रॅली वडगाव गट नंबर येथील शिवराणा चौकापर्यंत काढण्यात आली व शिवराणा चौकात पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *