
वाळूजमहानगर, (ता.9) – आठ मे हा दिवस वर्ल्ड थॅलेसेमिया डे म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी व श्री सत्य साई ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. यावेळी डॉ. मनोज तोष्णीवाल व डॉ. चिंतन व्यास यांनी थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना लागेल ती मदत करण्याचे व छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी वेगवेगळ्या ठिकाणी डे-केअर सेंटर स्थापना करण्याचे अवाहन थॅलेसेमिया सोसायटीला केले. तसेच केंद्रीय मंत्री या नात्याने थॅलेसेमिया ग्रस्त मुलांसाठी केंद्राकडून बीएमटी साठी 3 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देत केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून थॅलेसेमियाच्या रुंगांसाठी जे -जे करता येईल ते-ते करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे आश्वसनही त्यांनी दिले. डॉ. तोष्णीवाल यांनी मुलांच्या आहाराबद्धल तसेच यांची रुग्णांची काळजी घेण्याबद्दल मुलांच्या पालकांनी साविस्तर माहिती दिली.
डॉ. चिंतन व्यास यांनी बोनमॅरो ट्रान्सप्लॉन्ट बद्धल शंकाचे निरासारण केले. यावेळी डॉ. कराड यांनी थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आव्हान केले. यांचे आवाहान स्वीकारत इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी लवकरच कारखान्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करू आणि जास्तीत ज्यास्त व्यक्तींना करण्यास प्रोसाहित करू. असे आश्वासन दिली. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांमध्ये पुनीत गुप्ता, डॉ. व्यंकट मैलापूरे, प्रज्वल मिठावाला, अनंत बोरकर, जयदीप घुगे, डॉ. उल्हास शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून उपस्थित थॅलेसेमिया मुलांना भेट वस्तू देत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष कैलास अवचरमल, सचिव अनिल दिवेकर, श्री सत्य साई ब्लड सेंटरचे मेडिकल डायरेक्टर महेंद्रसिंग चौहान, संदीप म्हस्के, फेरोज खान आदींनी परिश्रम घेतले.
