March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – रिक्षामध्ये जातांना रिक्षा भरधाव व रोडची परिस्थीती न पाहता निष्काळजीपणाने चालवून एका प्रवाशाला रिक्षातुन खाली पाडुन त्याच्या मृत्यूस कारणीभुत झाला व अपघाताची खबर न देता घटनास्थळावरुन पळुन गेल्या प्रकरणी एका रिक्षा चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.9) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आशिष महादेव घुटे वय 30 रा. मुनगाव पाथर्डी ता. अकोट जि. अकोला हा गट नं. 1 नर्सरी कॉलनी रांजणगाव (शें. पु.) येथे आई वडिल, भाऊ व वहिनी सोबत राहुन संजीव अँटो या कंपनीमध्ये काम करतो. 15 आक्टोंबर 2022 रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आशिषचे वडील रांजणगाव ते झांबड चौक रिक्षा मध्ये जातांना चक्कर येऊन रिक्षामधुन जखमी झाले. त्यांना उपचार कामी घाटी दवाखाना औरंगाबाद येथे अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी त्याचे सीटी स्कॅन केले त्याच्या डोक्याला जास्त मार असल्याने डॉक्टरांनी त्यांना तत्काळ ससुन हॉस्पीटल पुणे येथे घेऊन जाण्यास सांगितले. दरम्यान 19 ऑक्टोंबर 2022 रोजी 11 वाजेच्या सुमारास ससुन हॉस्पीटल वार्ड क्र.9 मध्ये उपचार चालु असतांना डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. याप्रकरणी आशिष घुटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात रिक्षा चालका विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.9) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *