March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.5) – कारंजा जिल्हा वाशिम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर मुले व मुली डॉजबॉल स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगरचा संघ शुक्रवारी रावाना होणार आहे. या स्पर्धा 5 में ते 7 में दरम्यान होणार असून मुलांच्या संघाचा जय बंग तर मुलींच्या संघाची मानसी वाघ यांची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर महत्वाकांशी डॉजबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष संकेत वाणी, उपाध्यक्ष विश्वजीत चव्हाण, सचिव रामदास सारसर, सहसचिव प्रा. नारायण शिंदे, कोषाध्यक्ष विजय शिरसवाल, शेख शफी, अनिल पवार, मयूर कुमावत, कोमल चव्हाण, एस. अकॅडमीचे भाऊसाहेब कंक, अक्षय सोनवणे आदींनी संघांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर महत्वकांशी डॉजबॉल संघ मुले : जय बांग (कर्णधार) प्रणव मल्ले, यशराज साळुंखे, पियुष ढवळे, अक्षु चौधरी, करण कोरडे, प्रथमेश मोरे, नीरज पिंपळे, शिवराज शिंदे, आदित्य टाक, प्रशिक्षक अनिल पवार, व्यवस्थापक शेख शफी, छत्रपती संभाजीनगर महत्वकांक्षी डॉजबॉल संघ मुली : मानसी वाघ (कर्णधार), हर्षला चवले, श्रुती मोहिते, श्रेया मनभरे, ऋतुजा राठोड, ज्ञानेश्वरी पवार, दिव्या मदगे, मनस्विनी काळे, पृथ्वी वायाळ, श्रावणी बनकर. प्रशिक्षक प्रा. नारायण शिंदे, व्यवस्थापक श्रीमती कोमल चव्हाण आदींचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *