March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.5) – केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अतूल सावे यांच्या हस्ते जयराज पाटील यांनी औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर असोसिएशन (आईसा) च्या अध्यक्ष पदाचा पदभार छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामा येथे 21 एप्रिल रोजी स्विकारला. यावेळी बजाज उद्योग समूहाचे (प्रेसिडेंट) कैलास झांजरी, जालना येथील प्रतिष्ठित उद्योजक डी.बी.सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बजाज उद्योग समूहाचे कैलास झांजरी यांनी सर्वाना व्यवसाय कसा करावा. याबाबत मार्गदर्शन केले व संघटनेचे अध्यक्ष जयराज पाटील यांचे कौतुक करत पुढे मदत सुद्धा करण्याचे आश्वासन दिले. तर जालना येथील प्रतिष्ठित उद्योजक डी.बी.सोनी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्थानिक उद्योजक यांनी आपल्या शहरातील सप्लायर यांना संधी देऊन त्यांचा व्यवसाय वाढवा जेणे करून व्यवसाय बाहेर जाणार नाही. आमची काय मदत लागेल ती आम्ही करू.
राज्याचे कॅबिनेट मंत्री अतूल सावे यांनी भाषणात सांगितले की, आज मी फक्त जयराज पाटील यांच्या आग्रह खातर आलो आहे. अत्यंत प्रामाणिक व मेहनती आहे. आपल्या संघटनेला काही अडचणी आल्यास मी सोबत आहे. संघटनेने आपले कार्यक्षेत्र वाढवावेत. केंद्रीय राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खास स्पेशल चार्टर्ड विमानाने जयराज पाटील यांच्या साठी आलो आहे. असे भाषणात सांगितले. आपल्या संघटनेला 20 एकर जागा (इंडस्ट्रियल सप्लायर hub) साठी देऊ छत्रपती संभाजीनगर येथिल सर्व सप्लायर एकत्र येऊन हा प्रोजेक्ट करावा. असे डॉ कराड म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास लंके अणि अमित कोरडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष सुहास लंके, सचिव राहुल जाजू, कोषाध्यक्ष अभिजीत भालकीकर, संघटनेचे माजी अध्यक्ष मंगल पटेल, पंकज लोया, शैलेश देशपांडे, हरिभाऊ नाथांनी, गोपाल पटेल, पुरुषोत्तम हेडा, समीर कानाडखेडकर, सतीश लोणीकर, विजय जैस्वाल, मनीष भंडारी, प्रभूलाल पटेल, राजेश वैष्णव, शामराव गायकवाड, निलेश तोतला, बाळू पवार, सागर मालानी, किरण साकला, मिलिंद उमडीकर, टी.व्ही. जाधव, मयूर जालनवाला, हरेश पटेल आदी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *