
वाळूजमहानगर, (ता.5) – विनापरवाना व बेकायदेशीररित्या धारदार तलवार बाळगताना 27 वर्षीय आरोपी मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी (ता.4) रोजी मध्यरात्री करण्यात आली. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी ज्ञानेश्वर बाबूराव वडजे, वय-27 वर्ष, रा. मंगलमुर्ती कॉलनी, रांजणगाव (शेणपुंजी) हा विनापरवाना, कायदेशिररित्या धारदार तलवार बाळगत असतांना वाळुज औद्योगिक वसाहतीतील कोलगेट चौक, बजाजनगर येथे
गुरुवारी (ता.4) रोजीचे रात्री 12.20 वाजता मिळून आला.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 1 हजार रुपये किमतीची एक तलवार ज्याची काळी मुठ अंदाजे 4 इंच व त्याचेवर पिवळ्या धातुचे आवरण व समोर दोन फुटाचे स्टीलचे पाते जे एका बाजूने धारदार व पुढे टोकदार असे आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार हनुमान अण्णासाहेब ठोके यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर वडजे यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
