
वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात कामगार व व्यवस्थापन मिळून 206 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तर 154 जणांनी आरोग्य व नेत्र तपासणी करून घेतली. दरवर्षीप्रमाणे 30 एप्रिल रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन मेटल मॅनचे प्लांट हेड अनिल कुमार डहाळे, आशिष शर्मा, कृष्णकांत बीजमवार, प्रकाश एखंडे, राजेंद्र बडगुजर, सूर्यकांत शानबाग यांच्या हस्ते करण्यात आले. मेटल मॅन ऑटो ग्रुपचे सीओओ श्रीकांत मुंदडा यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात 206 जणांनी रक्तदान केले. तसेच 154 लोकांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. अति उन्हामुळे शहरात रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे मेटल मॅन तर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांना रक्ताची मदत व्हावी. या हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. या शिबिरात दत्ताजी भाले रक्तपेढीचे श्रीकृष्ण कुलकर्णी व त्यांच्या टीमने रक्त संकलन केले. तसेच हेडगेवार हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या वतीने आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेटल मॅनचे अवधूत शिंदे, गुरुदास पराते, राजेश मानकर, रवी पेठशिवनगर, किशोर जगताप, नारायण निकम, बाळासाहेब तांबे, दत्तात्रय धनक, प्रकाश साळुंखे, मकरंद निखाडे, संतोष जाधव, नारायण खोले, विकास शिंदे यांनी सहकार्य केले.
