March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – बजाजनगर येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात सद्गुरू ह.भ.प.मारोतीबाबा कुऱ्हेकर महाराज व सद्गुरू ह.भ.प. नामदेव महाराज चारठाणकर यांच्या आशीर्वादाने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी 1 मे पासून सुरू होणाऱ्या वारकरी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन ह.भ.प.डॉ. धर्माचार्य जनार्दन महाराज मेटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात सकाळी पखवाज, प्रार्थना, हरिपाठ अभंगावर चिंतन, गितेतील 9,12,15 अध्यायाचे संहिता व विष्णु
सहस्रनाम संहिता,दुपारी गायन वादन शिक्षण व संत चरित्र, सायंकाळी हरिपाठ व पावल्या मार्गदर्शन आदी कार्यक्रम होतील. 21 मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी वारकरी संप्रदायातील वाद्यांसह किर्तन, प्रवचन परंपरेचे प्रशिक्षण घेतील. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण द्यायला वारकरी संप्रदायाचे शिक्षक ह.भ.प. आप्पासाहेब महाराज गायके , ह.भ.प.बबन महाराज चौरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर कोरडे, ह.भ.प.मोहन महाराज हातकडके, ह.भ.प. पांडुरंग महाराज पवार, ह.भ.प.परमेश्वर महाराज कोरडे, ह.भ.प.भीमराव महाराज भवर, ह.भ.प.भागवत महाराज गोराडे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कांबळे, ह.भ.प.कैलास महाराज बारगळ हे शिक्षण देणार आहे.
यावेळी दामोधर घुगे, माजी सरपंच सचिन गरड, कैलास भोकरे, निलेश सोनवणे, तानाजी सरडे, संतोष पाटील चौधरी व परिसरातील भक्तगण उपस्थित होते.
परिसरातील भाविकांनी या शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन युवा कीर्तन कार शिक्षक ह.भ.प. आप्पासाहेब महाराज गायके यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *