March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.30) – ग्राम पंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा हिशेब मागितल्याने प्रभारी सरपंचाच्या पतीने गैर कायद्याची मंडळी जमा करून एका महिला ग्रामपंचायत सदस्याच्या दीरावर चाकू हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वाळुज औद्योगिक परिसरातील विटावा येथे शुक्रवारी (ता.28) रोजी घडला. या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (ता.28) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विटावा ग्रामपंचायतची मासिक मिटींग झाली. यावेळी बालाजी बाबूराव सूर्यवंशी (वय 35) यांचा भाऊ बळवंत सूर्यवंशी यांनी इटावा ग्रामपंचायातचा हिशोब मागितला. बळवंत सूर्यवंशी यांची पत्नी रंजना बळवंत सूर्यवंशी या विटावा ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत. हिशोब मागितल्यामुळे मासिक सभेतून बाबासाहेब लक्ष्मण घुले हा बाहेर आला. व बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांना म्हणाला की, तुझ्या भावाने मासिक समेत कारण नसताना कामाचा हिशोब मागितला. तुम्हाला आता पाहून घेतो. अशी धमकी दिली. नंतर सध्याकांळी 7.15 वाजेच्या सुमारास बालाजी सूर्यवंशी हे त्यांच्या कंपनीच्या शॉप समोर उभा असताना बाबासाहेब घुले याचा भाचा बाळासाहेब मुंढे हा बालाजीकडे आला व म्हणाला की, माझ्या मामाकडे चला. म्हणून बालाजी बाबूराव सूर्यवंशी हे त्याच्या सोबत बाबासाहेब घुले यांच्याकडे गेले. तेव्हा बाळासाहेब घुले यांनी बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांना मारहाण केली. त्यावेळी तेथे रोहन बाबासाहेब घुले, उत्तरेश्वर घुले, तात्याराव आघाव, कमलाकर शेफ, परमेश्वर घुले व अन्य पाच ते सहा जन होते. त्यांनी बालाजीला शिवीगाळ करून जास्त माजला का तुला पाहून घेतो. असे म्हणून हाताचापटाने व चाकूने मारहाण केली. त्यात बालाजी सूर्यवंशी गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याठिकाणी बघ्याची गर्दी जमत असल्याने बालाजी बाबूराव सूर्यवंशी यांना मारहाण करणारे तेथून पळून गेले. याप्रकरणी बालाजी सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहन बाबासाहेब घुले, उत्तरेश्वर घुले, तात्याराव आघाव, कमलाकर शेफू, परमेश्वर घुले व अन्य पाच ते सहा जणांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *