March 24, 2026


वाळूज महानगर, (ता 27) – बहुमताचा आकडा गाठत ग्रामपंचायतचे 10 सदस्य सहलीला रवाना झाल्याने जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या महानाट्याने वेगळेच वळण घेतले असून या महानाट्यावर सरपंच व उपसरपंच निवडीने पडदा पडणार आहे.

मनमानी कारभार करणे, विश्वासात घेऊन काम न करणे, स्वतःच्या वार्डात काम करणे. असे वेगवेगळे थक्के ठेवत जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या काही असंतुष्ट सदस्यांनी सरपंच गजानन बोंबले व उपसरपंच प्रवीण दुबिले यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. दरम्यान अपहरण, धरपकड, झोंबाझोंबी, गाडीला मोबाईल लावून उडवून देणे किंवा लोकेशन घेण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक नाट्यमय रित्या घडामोडी घडल्या. एवढे करूनही हा विश्वास ठराव पास झाला होता. त्यामुळे अनेक महिने रंगलेल्या या महानाट्यावर पडदा पडला. असे सर्वांनी गृहीत धरले होते. मात्र गुरुवारी (ता.27) रोजी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या महानाट्याला वेगळी कलाटणी बसली असून बहुमताचा आकडा गाठत 10 ग्राम पंचायत सदस्य सहलीला रवाना झाले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या नव्या सरपंच व उपसरपंचाची निवड लवकरच होऊन महानाट्यावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुन्हा भगवाच फडकणार
जोगेश्ररी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेनेचे गजानन बोंबले व उपसरपंच सुद्धा शिवसेनेचेच प्रवीण दुबिले विराजमान असताना भाजपाच्या काही नेत्यांनी काडी टाकली आणि फोडाफोडीचे राजकारण रुपी महानाट्य रंगले. त्यामुळे शिवसेनेच्या हातून सत्ता गेल्यात जमा होती. मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची वज्रमूठ बांधली. आणि बहुमताचा आकडा गाठत सदस्य सहलीला रवाना झाले. त्यामुळे जोगेश्वरी ग्रामपंचायत वर पुन्हा भगवाच फडकणार हे निश्चित मानल्या जात आहे.

सरपंच आरगडे तर काजळे होणार उपसरपंच

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सहलीला रवाना झाले असून सरपंचपदी योगिता रामेश्वर आरगडे तर प्रभाकर सुर्यभान काजळे हे उपसरपंच होणार असल्याचे सांगितल्या जाते. त्यांची साथ, संगत सोनु अमोल लोहकरे, प्रवीण दुबिले, गजानन बोंबले, मीना पंडित पन्हाड, भारती गणेश साबळे, शांताबाई मन्साराम बिलवाल, अनिल वाघ, रुक्मिणी कृष्णा काजळे तसेच युवा सेनेचे उप तालुका अधिकारी रमेश आरगडे व सुर्यभान काजळे हे देणार आहे. त्यामुळे वाळूज परिसरातील सर्वांचे लक्ष जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत कडे लागले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *