May 9, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त वाळूज महानगरातील बजाजनगर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम व ग्रामगीता अध्ययन केंद्र येथे रविवारी (ता. 30) रोजी ग्रामजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 114 वी जयंती 30 एप्रिल रोजी सर्वत्र ग्रामजयंती म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार बजाजनगर येथे दरवर्षी ग्रामजयंती उत्सव साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त अभिवादन, भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर, रामधून, सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, तसेच सायंकाळी 7 वाजता ग्रामगीताचार्य श्रीकृष्ण सावळे गुरुजी, अकोला यांचे कीर्तन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरचे अध्यक्ष अनिल अर्डक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून राष्ट्रवंदना व महाप्रसाद वितरणाने समारोप होणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *