March 28, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – आई-वडील, भाऊ,आजी व नवऱ्यापासून विभक्त झालेल्या बहीणीसह पंढरपूर येथे राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीच्या भाऊजींने फोटोवर अश्लील मेसेज लिहुन ते फोटो रस्त्यावर टाकून विनयभंग केला. तसेच ते फोटो होणाऱ्या नवऱ्याला व लग्न मंडपात दाखवण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी (ता.22) रोजी वाळूज परिसरात घडला.


बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी संभाजी होणाजी डवारे वय 34 वर्ष याचे पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीशी 2019 मध्ये लग्न झाले आहे. मात्र ती व तिचा पती याच्यात घरगुती वाद झाल्याने ती माहेरीच राहते. प्रकरण या तक्रार निवारण केंद्रात आहे. पीडित तरुणीचा विवाह पुढील महिन्यात ठरला आहे. शनिवारी (ता.22) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आरोपीने पिडीत तरुणीच्या फोटोवर अश्लील मेसेज लिहून ते तिच्या वॉटस्अप नंबरवर टाकले. तसेच पत्नीला उद्देशून तु जो पर्यत येत नाही, तोपर्यत मी पैसे देवुन सालीचे ते फोटो तिच्या गावी व सगळ्यागावात टाकतो, होणाऱ्या नवऱ्याला व लग्नात पण फोटो टाकतो. अशी धमकी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *