वाळूजमहानगर, (ता.23) – वाळूज परिसरातील येसगाव येथे वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ व चर्चा झाल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे. परिणामी शेत वस्तीवर राहणाऱे शेतकरी भयभीत झाले असून वन विभागाने तात्काळ दखल घ्यावी. अशी मागणी करण्यात येत आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येसगाव येथील नामदेव विश्वनाथ दिवटे यांच्या शेत गट नं. 59 मध्ये गणेश दिवटे हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरणीचे काम सुरू होता. शनिवारी (ता.22) रोजी मध्यरात्री सुरू असलेली नांगरणी करताना ट्रॅक्टर चालकाला अचानक वाघा सारख्या प्राण्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्याची पाचावर धारण झाली. यावेळी त्याच्यासोबत नामदेव दिवटे साथीदार होते. त्यामुळे दोघांनी तग धरून बॅटरीच्या प्रकाशात या वाघा सारख्या दिसणाऱ्या प्राण्याचे मोबाईलच्या साह्याने चित्रीकरण केले. गेल्या आठवड्यातही वाघाचे दर्शन परिसरात झाले होते. त्यानंतर एका कुत्र्याची शिकार झाल्याचे समोर आले होते. रविवारी (ता.23) रोजी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली असून शेत वस्तीवर राहणाऱ्या मध्ये घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान या वाघाचा शोध घेऊन किंवा तात्काळ पिंजरा लावण्यात यावा. अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने वन विभागाला करण्यात आली आहे.
वन विभागाला माहिती –
दरम्यान येसगाव शिवारात वाघाचे दर्शन झाल्याच्या घटनेला येसगाव येथील पोलीस पाटील कृष्णा रामभाऊ काळे यांनी दुजोरा दिला असून त्यांनी वनविभागाचे शंकर कवठे यांना माहिती दिल्याचेही आर के न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले.
वन विभाग करणार पाहणी –
दरम्यान वनविभागाचे पी आर ओ शंकर कवठे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, येसगाव शिवारात वाघाची माहिती मिळाली आहे मात्र तो वाघ आहे की अन्य दुसरा प्राणी हे निश्चित सांगता येणार नाही. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी रवाना होत आहे. घटनास्थळी असलेल्या प्राण्याच्या पायाच्या ठशावरून या प्राण्यांची माहिती मिळू शकेल.
संरक्षणासाठी असा करा उपाय –
वाघ व तत्सम प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी मशाल पेटवा आणि मिरची टाकून ठसका करा. ठसक्यामुळे वन्य प्राणी शेतात येत नाही. त्यापासून संरक्षण होते. याबाबतचा व्हिडिओ पहा……
