March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.20) – विक्री केलेला मोबाईल परत मागितल्याच्या कारणावरुन एका 28 वर्षीय तरुणास चोप देऊन वीट मारून त्याचे डोके फोडले. ही घटना बुधवारी (ता.19) रात्री 8 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर येथील राजु भुजंग मनोहर याने काही दिवसापुर्वी ओळखीचा विशाल बनकर यास जुना मोबाईल विक्री केला होता. यानंतर पैसे आल्याने राजु मनोहर याने बुधवारी (ता.19) रात्री 8 वाजेच्या सुमारास विशाल बनकर यास मोबाईल परत मागितला. विक्री केलेला मोबाईल परत मागितल्याने संतप्त झालेल्या विशाल बनकर याने राजु भुजंग यास शिवीगाळ करुन मारहाण केली. या वादात विशाल याने रस्त्याच्याकडेला पडलेली वीट राजु भुजंग याच्या डोक्यात मारुन त्याचे डोके फोडले. यावेळी गल्लीतील नागरिकांनी मध्यस्थी करीत विशाल याच्या तावडीतुन राजु भुजंग याची सुटका केली. या मारहाणीत जखमी झालेल्या राजु भुजंग यास त्याचा नातेवाईक जितु हिवाळे याने उपचारार्थ घाटीत दाखल केले. या प्रकरणी विशाल बनकर याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
————————

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *