March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.20) – संशयाच्या भूताने पछाडलेल्या एकाने चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण करुन भिंतीवर आपटून डोके फोडले. ही घटना बुधवारी (ता.19) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुजा संजय लेंडाळ (20) या पती संजय व लहान मुलासह रांजणगाव (शेणपुंजी) येथे राहतात. बुधवारी (ता.19) रात्री 9 वाजेच्या सुमारास संजय लेंडाळ याने पत्नी पुजा हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासोबत भांडण केले. यावेळी पुजा हिने पती संजय यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने पत्नीला शिवीगाळ करुन हाता-चापटाने मारहाण केली. या भांडणात रागाच्या भरात संजय याने पत्नी पुजा हीचे डोके भिंतीवर आदळल्याने तिचे डोके फुटले. डोक्यातुन रक्तस्त्राव सुरु झाल्याने घाबरलेल्या पुजा हिने आई आशा कडेकर व वडील बाबुराव कडेकर यांच्याशी संपर्क साधुन त्यांना घरी बोलावुन घेतले. या मारहाणीत जखमी झालेल्या पुजा हिस तिच्या आई-वडिलांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. या प्रकरणी पुजा लेंडाळे यांच्या तक्रारीवरुन आरोपी पती संजय लेंडाळे विरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *