
वाळूजमहानगर, (ता.16) – सध्या मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या या महिन्याच्या उत्सवात दररोज मुस्लीम बांधव इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल खान पठाण यांच्या वतीने शनिवारी (ता.15) रोजी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 
सर्व मुस्लिम बांधव रमजान या पवित्र महिन्यात दिवसभर रमजानचे उपवास (रोजे) करून सायंकाळीं इफ्तार पार्टीचे आयोजन करून उपवास सोडतात. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सामाजिक सलोखा जपत मुस्लीम धर्मीयाबरोबर त्यांच्या इफ्तार पार्टी मध्ये हिंदू बांधवही मोठ्या संखेने सहभागी झाले होते. यावेळी माजी चेअरमन सर्जेराव भोंड, नारायणपूरचे सरपंच नासेर पटेल, वाळुजचे उपसरपंच योगेश आरगडे, भाजपाचे रामेश्वर मालुसरे, ग्रा प सदस्य काकासाहेब चापे, राहुल भालेराव, दयानंद साबळे, नदीम झुंबरवाला, अमजद खान पठाण, पोपट बनकर, तौफिक पटेल, सचिन काकडे, पो उप नि. जलील पठाण, माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार खान पठाण, विजय साबळे, जगन्नाथ आरगडे, हाजी इब्राहिम खान पठाण, संजय भालेराव, साबेर खान, अफरीद खान, शमशुद्दीन शेख अतीक खान, जावेद बेग, रियाझ खान आदीसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
