
वाळुज महानगर, (ता 14) :- रांजणगाव (शे. पु.) येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन शुक्रवारी (ता.14) रोजी डॉक्टर आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी मुख्याध्यापक इस्माईल शेख, संचालक अक्षय हरकळ, मनीषा वाघमोडे, साळवे, रोहिमल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर विद्यार्थी व शिक्षकांनी विविध भीमगीते सादर केली. तद्नंतर न्यू शहीद भगतसिंह विद्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रांजणगाव (शेणपुंजी) पर्यंत शाळेच्या वतीने प्रबोधनपर रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता मुंडकर, प्रास्ताविक आनिता हिजे तर आभार सागर लाड यांनी मानले.
