
वाळुज महानगर, (ता 14) :- मदर तेरेसा इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र मराठी स्कूल वाळूज येथे संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष नबी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांची 132 वी जयंती शुक्रवारी (ता.14) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अफसर पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गट तालुका उपाध्यक्ष नंदकुमार राऊत साहेब यांची उपस्तिथी होती. प्रथम अध्यक्षाच्या हस्ते “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर”यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उकिर्डे रविंद्र, शेख इरफान, सय्यद अय्युब, सिमा शेख, वैशाली गाडेकर, मोहिनी देशमुख, गणेश बनकर, बाळू पालवे, दिनेश पालोदकर, अंभोरे रघुनाथ, गोरे अरविंद, खरात संतोष, रवींद्र फरकाडे, शेख ताजोद्दीन, बारवाल किसन, शेळके राहुल यांची उपस्थित होती.
