March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.13)- श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर, श्री. गजानन ज्युनिअर कॉलेज व बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल, रांजणगाव (शे.पु.) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये विविध पथनाट्य, लेझीम पथक, झांज पथक, ढोल पथक यांचा सहभाग होता.

यावेळी ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्रावर आधारित इयत्ता 2 री च्या मुलांनी पथनाट्याद्वारे समाजाला प्रबोधन केले. नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला.

कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हरीश जाधव, प्राचार्य महेश शिनगारे, श्री गजानन प्राथमिक शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक एम. व्ही. शिनगारे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल च्या प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा बिदरकर, माध्यमिक मुख्याध्यापक बी. व्ही. शिरसाठ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा देशपांडे यांनी केले. कार्यक्रम यासास्वीतेसाठी शहाजी मंगनाळे, हनुमंत जाधव, सौरभ लगड, सुनील शिंदे, संजय तुपे, शहाजी पठारे, उल्हास वाघ, सुभाष जाधव, छाया वाघदरे, रोकडे सर, मनीषा नवथर, अश्विनी सूर्यवंशी, शैलजा शिनगारे, संभाजी जाधव, बिंदू प्रजापती, धनंजय जाधव, वैष्णव लता, पूजा खोतकर, ममता खोतकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार एम. व्ही. शिनगारे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *