March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.13)- बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गुरुवारी (ता.13) रोजी मोठ्या उत्साहात साजरी झाली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. मधुकर महाराज बारूळकर होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडे, समूहगीत, भाषण आदीचे सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली. त्यानंतर प्रमुख अतिथी ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच या महामानवांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजाबद्दल असलेली आत्मीयता, समाजाच्या उन्नतीसाठी घेतलेले खडतर परिश्रम इत्यादी विषयी सखोल विवेचन केले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने शाहू, फुले व आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. तेच आपल्या शैक्षणिक क्रांतीचे प्रेरणास्थान आहे. असे आपल्या मनोगतात म्हटले. याप्रसंगी या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, समन्वयक राणी सावंत, समन्वयक गहेना शादीजा यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील कु. आर्या पांडे व कु. मृण्मयी कांबळे या विद्यार्थिनींनी केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *