March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.12) – दुचाकी चोरी करून त्या विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वाळूज पोलीस ठाण्याच्या विशेष पथकांनी पकडून त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीच्या दोन चाकी जप्त केल्या. ही कारवाई 10 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वाळूज येथे करण्यात आली.

वाळुज पोलीस स्टेशनचे विशेष पथकांचे अधिकरी व अमंलदार पेट्रोलींग करीत असताना 10 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेचे सुमारास माहीती मिळाली की, प्रशांत प्रकाश निकाळजे वय 24 रा. साठेनगर, वाळुज हा रामराई रोड वाळुज येथे चोरीची मोटरसायकल घेवुन येणार आहे. ही माहीती मिळताच विशेष पथकाने तेथे सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने दोन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याच्या ताब्यातुन 1 लाख रुपये किंमतीच्या दोन हीरो कंपनीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहे.

ही कार्यवाही पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उप-आयुक्त दिपक गि-हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उप-निरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस अंमलदार आनंद वाव्हळ, विजय पिंपळे, गणेश लक्कस, विक्रम मडावी यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *