March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.7) : – कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेता, इप्का फाऊंडेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) आणि गेब्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग (तपासणी पॅप स्मेर, कॉल्पोस्कोपी, व्ही.आय, ब्रेस्ट) अत्याधुकीन तंत्रज्ञानाच्या साह्याने व कर्करोग जनजागृती शिबिराचे भव्य आयोजन शनिवारी (ता.8) सकाळी 10 वाजता, पोलीस आयुक्तालय कार्यालय वडगाव (कोल्हाटी) येथे करण्यात आले आहे.

या शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयातर्फे डॉ. संजय राठोड, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अर्चना राठोड, डॉ. ऋषिकेश खाडिलकर या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मोफत तपासणी शिबिराचा व मार्गदर्शनाचा जास्तीत ज्यास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आव्हान इप्का फाऊंडेशन तर्फे डॉ. व्यंकट मैलापूरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय आणि गेब्स फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *