
वाळूजमहानगर (ता.7) – घाणेगाव येथील सरस्वती इंग्लिश स्कूल व सरस्वती विद्यामंदिर आणि जुनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात झाले. शाळेतील बालकलाकारांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मयूर त्र्यंबके है उपस्थित होते.
घाणेगाव येथील सरस्वती इंग्लिश स्कूल व सरस्वती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यामाने कलाविष्कार 2023 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भाषेतील गाण्यांवर नृत्या सोबतच दारूबंदी नाटिका, मोबाईलचे दुष्परिणाम, शाळेतील गमती जमती, विनोदी उखाणे, गीतगायन, लावणी, गोंधळ, कोळीगीत, शेतकरीगीत, कोविडथीम, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार इत्यादी विविध कलांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा प्रारंभ जेष्ठ नागरिक सरस्वतीबाई कानिटकर, ह.भ.प. बबनराव चौरे, जि.प. सदस्य श्यामराव बनसोडे, सरपंच केशव आप्पा गायके, उपसरपंच सुधाकर गायके, संस्थेचे संचालक केशव कानिटकर, सुधाकर जवळकर, माधव कानिटकर यांच्या हस्ते दिपप्रज्वललाने झाला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या टीव्ही मालेकीतील अभिनेते मयूर त्र्यंबके है होते. त्यांनी अभिनय कला ही उपजत असते मात्र ती सुप्त अवस्थेतील कला अशाच शालेय कार्यक्रमातून विकसित होत असते. हे सांगत असतानाच शाळेतील मुलांनी दाखवलेल्या कलागुणांचे कौतुक ही केले. या प्रसंगी संतोष उगले, सुनील पाडळकर, बबन महाराज चौरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सुरेखा शिंदे, सुरेश वाघचौरे, प्रकाश परदेशी, अशोक गोरे, दत्तात्रय पवार, रत्नाकर फाळके, अशोक मुटकुळे, पालक प्रतिनिधी सोपान कालवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सुनंदा काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल मगर व रमा शेजूळ यांनी केले तर आभार केशव कानिटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सहशिक्षिका शिल्पा पाटील, गंगा जुये, मधुरा भांडेकर, अनुराधा मुंडेकर, अनुराधा पोद्दार, कोमल बनसोडे, आशा काळे, सोनाली राणे, संगीता भांड, कार्तिक पवार, पंकज महामुनी, किरण मानेकर, ललिता पांडव यांनी प्रयत्न केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
