
वाळूजमहानगर (ता.6) – कंपनीच्या बाहेर दुचाकी उभी करून आत मध्ये गेलेल्या एका कामगाराची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का कंपनी समोर घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपतीनगर हडको येथील सचिन निवृत्ती भवर वय 32 हा कामगार वाळुज औद्योगिक वसाहतीतील इप्का कंपनीत इंटरव्यू साठी गुरुवारी (ता.30) रोजी गेला होता. तो इंटरव्यू देऊन कंपनीच्या बाहेर आला असता तेथे उभी केलेली त्याची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 20,ई एम-2918) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
